येळ्ळूरात २० वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
येळ्ळूर: मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी ती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी लढत असतांना केवळ भावनेला महत्व देऊन चालणार नाही. मातृभाषा जगविण्याबरोबरच कृतीतून तिचे संवर्धन झाले पाहिजे. सीमाप्रश्नाला एका विशिष्ठ साच्यात बांधून न ठेवता, या प्रश्नाला वैश्विक विचारांची जोड द्यायला ही, असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
येथील ग्रामिण मराठी साहित्य संघाच्यावतीने आयोजीत २० व्या साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुढे बोलतांना डॉ. बाविस्कर म्हणाले, आपण मराठी टिकली पाहिजे असे गळे काढतो, पण आपली मुले इंग्रजी शाळेत पाठवितो. अशाने मातृभाषा टिकणार आहे का? आपली मातृभाषा साहित्य, तत्वज्ञान, संशोधन आणि दररोजच्या व्यवहारात वापरली गेली पाहीजे तरच ती टिकेल. फ्रान्समध्ये हे होते. त्यामुळेच छोटासा देश असूनही तेथील साहित्य वाचले जाते. सीमेचा वाद निर्माण होतो, तेव्हा आपण संघर्षातून द्वेषाकडे जात असतो. सीमांना राजकीय संबंध नसतो. भावनाशील न होता, भाषांचा हा न्यायाशी जोडला गेला पाहीजे. तरच त्यातून अपेक्षीत फलश्रुती होईल.
ढोल-ताशांचा गजर आणि मृदंगाच्या निनादात प्रारंभी गावातून ग्रंथदिडी निघाली. संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आर.एम.चौगुले यांच्याहस्ते झाले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘आपली संस्कृती-आपला विकास’ या विषयावर कॉ.दत्ता देसाई यांनी विवेचन करतांना संवाद जोडणे ही आपली संस्कृती असायला हवी. संवाद हा वाचनाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, म्हणून वाचन संस्कृती वाढली पाहिजे असे मत मांडले.
तिसऱ्या सत्रात लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे यांनी तासभर साहित्य रसिकांना खळखळून हसविले. स्पर्धेमुळे आपण हसणे हरवून बसल्याची खंत व्यक्त करतांनाच त्यांनी विनोदातून प्रबोधन घडविले. चौथ्या सत्रात किशोर काकडे यांनी अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुलाखत घेतली. भाषाभिमानामुळे मराठी नाटक आणि मालिकांना दर्शकांनी पसंती दिली आहे. नाटकातून स्वच्छ मराठी भाषेचा परिचय होत असतो, असे मत वंदना गुप्ते यांनी व्यक्त केले. शवटच्या सत्रात सांगोल्याचे संदीप मोहिते आणि अण्णा चव्हाण यांनी भरूडातून लोकप्रबोधन केले. यावेळी विचारपिठावर ॲड. सुधीर चव्हाण, उद्योजक मदन बामणे, नागोजी गावडे, निलेश पाटील, अमर जाधव, ॲड. अजय सातेरी, ॲड सतिश बामदोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवलत्ती मारहाण प्रकरणी चौघांच्या मुसक्या अवळल्या
समांतर क्रांती / खानापूर देवलत्ती (ता. खानापूर ) येथील महेश नारायण सिमनगौडर (वय 35) याचे अपहरण करून खूणाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी फरार असलेल्या चार संशयित आरोपीच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संदीप लक्ष्मण चलवादी (27, रा. कग्गणगी), राघवेंद्र प्रकाश चलवादी (32, लक्केबैल), मारुती तानाजी कांबळे (28, देवराई) आणि राजशेखर […]