समांतर क्रांती / येळ्ळूर
येथे उद्या रविवारी (ता. 5) रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत.
संमेलन पाच सत्रात होणार असून संमेलनाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथ दिंडीने होणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते होईल. त्यानंतर स्वागताध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी उपस्थितांचे स्वागत करतील.
पहिल्या सत्रात सकाळी १०.३० वाजता उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुपारी १ वाजता दुसऱ्या सूत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे ‘आपली संस्कृती, आपला विकास’ या विषयावर विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण होणार आहे. अल्पोपहार २.३० वाजता तर दुपारी ३ वाजता “एक तास बसा… मनसोक्त हसा” हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. चौथ्या सत्रात ४ वाजता सिने अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पाचव्या सत्रात ५ वाजता ‘जागर लोककलेचा’ हा जुगलबंदी भारुड कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत.
संमेलन नगरीला दिवंगत अॅड. परशुराम नाईक, तर दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. ग्रंथदालनाला दिवंगत बाबुराव गोरल यांचे नाव तर दिवंगत रामचंद्र गोरल यांचे नाव सभामंडपाला देण्यात आले आहे. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
खानापूर फिश मार्केटमध्ये तब्बल ६२किलोंचा मासा
समांतर क्रांती / खानापूर येथील मासळी बाजारात आज रविवारी (ता. ५) सकाळी ६२ किलो वजनाचा छत्री मासा (स्वॉर्डफिश) दाखल झाला. हा मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मासळी विक्रेते रोहित पोळ यांच्या दुकानात हा मासा आल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी खवय्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली आहे. गोव्यातील वास्को समुद्रात काल शनिवारी हा मासा आढळून आला. आज पहाटे […]