बेळगाव: विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन मुलांना खेळापासून आवड व शारीरिक शिक्षणापासून वेगवेगळ्या फायद्यांचा प्राथमिक शाळेतील मुलांना कसा फायदा करता येईल यासाठी अहोरात प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन दहा प्राथमिक शाळांमध्ये पतंजली योग विद्यापीठाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.
बेळगाव येथील सावगाव व बेंकनहळी प्राथमिक शाळा व खानापूर तालुक्यातील हेबाळ गावाममध्ये विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजून सांगून योगाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबीं मुलांना आकलन करून देण्यात आले. तसेच 40 मिनिटाची वेगवेगळी योगासने व त्या योगासनांचा शारीरिक सदृढतेसाठी कशा पद्धतीने उपयोग होतो हे स्पष्ट करण्यात आले.
सावगाव शाळा सुधारणा समितीचे सदस्य कल्लाप्पा पाटील यांनी सुद्धा योगाच्या महत्त्वाबद्दल व शाळेत चालू केलेल्या उपक्रमाची माहिती दिली. योगशिक्षिका अनिता खांडेकर यांनी या शाळेमध्ये वेगवेगळे योगाचे असणे प्रात्यक्षिक करून दाखवली व विद्यार्थ्याकडून ती करवुन घेतली. फाउंडेशनचे सेक्रेटरी रवी बिरजे यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली. लहान मुले खेळाकडे कशी आकर्षित होतील व उच्च स्तरावर पोहोचून खेळामध्ये प्राविण्य दाखवतील यासाठी ही संस्था काम करते. योगशिक्षक अनिल व किरण मनोरकर, फाऊंडेशनचे संचालक विनोद गुरव यानी विषेश प्रयत्न केला.
दळवी दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात
खानापूर: राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी आणि निवृत्त मुख्याध्यापिका अरूंधती दळवी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे माजी अध्यक्ष गोपाळ देसाई, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, निवृत्त शिक्षक डी.एम.भोसले, डी.एम.भोसले, प्रकाश चव्हाण, महादेव घाडी, बाळसाहेब शेलार, अनंत पाटील यांच्यासह अनेक […]