समांतर क्रांती / खानापूर
वैयक्तीक कामाच्या निमित्ताने बंगळूरला गेलेल्या चापगावच्या तरूणावर काळाने घाला घातला. बंगळूर येथील मॅजेस्टीक बस स्थानकाजवळ रात्री बसने चिरडल्याने भूषण भावकान्ना पाटील (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई वडील व भाऊ बहीण असा परिवार आहे.
भूषण हा कामानिमित्त बंगळूरला गेला होता. तो मॅजेस्टीक बस स्थानक परिसरातील रस्त्याने चालत असतांना त्याचा तोल जाऊन तामिळनाडू परविहन मंडळाच्या बसखाली सापडला. त्यात तो जागीच ठार झाला असल्याचे सांगण्यात आले. मॅजेस्टीक पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
मुरलीधर पाटील यांची हॅटट्रीक
समांतर क्रांती / खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांनी हॅटट्रीक साधली आहे. खानापूर भूविकास बँकेवर चौथ्यांदा निवडून गेलेले मुरलीधर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आज झालेल्या निवडणूकीत त्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आमटे ग्रा. पं. माजी अध्यक्ष लक्ष्मण घेमा कसर्लेकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर संचालक व […]