समांतर क्रांती / खानापूर
भरधाव दुचाकीने झाडाला ठोकारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. 6) दोड्डहोसूर येथे हा अपघात घडला. यात सावंत नींगप्पा शिंदे (22, नंदीकुर्ली, ता. रायबाग) हा ठार झाला असून अभिषेक नींगप्पा अगसीमणी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
खानापूर पारिश्वाड मार्गावर दोड्डहोसूर येथे त्यांच्या भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीची झाडाला धडक बसली. त्यात सावंत हा ठार झाला. दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची खानापूर पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर तालुक्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
खानापूरातील भ्रष्टाचारविरोधात मोहीम उघडणार
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतपासून ते तहसीपर्यंत सगळ्याच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे. जाणसामान्यांचे एकही काम आर्थिक गैरव्यवहाराशिवाय होत नाही. त्यामुळे जनता मेटकुटीस आली आहे. तालुक्यातील भ्रष्टाचारविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. जनतेची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. खानापूर शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात सावळागोंधळ आहे. […]