समांतर क्रांती / नंदगड
खानापूर तालुक्यातील हंदूर येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१४) घडली. या घटनेत माबुली हसनसाब काद्रोळी असे या घटनेत मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, माबुली हा आज सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गावापासून जवळच असणाऱ्या तालवाकडे गेला होता. तो दुपार उलटून गेली तरी घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसला.
या घटनेची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. नंदगड पोलीसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक फेब्रूवारीत?
समांतर क्रांती / बेळगाव जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या कार्यकारीणी बरखास्त होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरी निवडणूक घेतली न गेल्यामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. आता तर कॅग (नियंत्रण आणि महालेखापाल) अहवालात सुध्दा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी फेब्रूवारी महिन्यात निवडणूक होईल, असे सुतोवाच्च केले आहे. २०२१ मध्ये जिल्हा आणि […]