
खानापूर: येथील मलप्रभा नदीत घाटाजवळ मन्नूर, ता. बेळगाव येथील तरूण बुडाल्याची घटना आज रविवारी (ता.२६) घडली. समर्थ मल्लाप्पा चौगुले (२२) असे या तरूणाचे नाव असून तो कुटुंबीयांसमवेत धार्मिक कार्यासाठी येथे आला होता.
कुटुंबीय परड्या भरण्याच्या कार्यक्रमात गुंतले असताना समर्थ हा पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरला होता. घाटाजवळ पाणी अडविण्यात आल्याने भरपूर पाणी आहे. त्यात त्याला पाण्याचा अंदाज आला नसावा व तो बुडाला असा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लालेसाब गवंडी यांच्यासह अग्नीशामक दलाचे मनोहर राठोड यांनी धाव घेऊन तात्काळ शोधकार्य हाती घेतले. अद्याप तरूणाचा शोध लागलेला नाही. यावेळी घाटावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
हृदयद्रावक : एकुलता मुलगा गेला, आता जगायचं कुणासाठी?
समांतर क्रांती / खानापूर आधी मोठा मुलगा आजाराने गेला. त्यातच मुलाच्या जाण्याचा धक्का न सहन झाल्याने वडीलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. ज्याच्याकडे पाहून ‘ती’ माऊली जगत होती, त्यालाही आज मलप्रभा नदीने कवेत घेतले. पाण्यात बुडून त्याचे मृत्यू झाला. आता जगायचे कुणासाठी अशी आवस्था त्या माऊलीची झाली आहे. देवकार्यासाठी आलेल्या त्या महिलेचा शेवटची आशा अशी मातीमोल झाल्याने […]