समांतर क्रांती / जांबोटी
खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.२९) सायंकाळी घडली. या घटनेतील मृत महांतेश गुंजीकर (वय २७, रा.खासबाग-बेळगाव) हा बेळगाव येथील एका कंपनीचा कर्मचारी होता.
याबाबतची अधिक माहिती अशी, मृत महांतेश हा त्याच्या कंपनीतील अन्य २२ कर्मचाऱ्यांसह पार्टीसाठी कणकुंबीजवळील रिसॉर्टमध्ये आला होता. सायंकाळी जलतरण तलावात उतरला. स्विमिंग ट्यूबमध्ये गुदमरल्याने तो बेशुध्द झाला होता. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले.
खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
संप मागे घेतला, बस सुरू राहणार..
बेंगळुरू: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने (जेएसी) ३१ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भेट घेऊन २००० कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करण्यास सहमती दर्शविल्यानंतर संयुक्त कृती समितीने संपचा निर्णय मागे घेतला आहे. बस सुरू राहणार आहेत. एआयटीयूसीशी […]