आयपीएल बेटींगप्रकरणी आठ जणांवर कोलवा पोलिसांची कारवाई
मडगाव: आयपीएल बेटींगप्रकरणी कोलवा पोलिस स्थानक हद्दीतील बाणावलीत आठ तरूणांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून १८ लाखांचा मुद्दमाल जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये भूषण पुजारी, ॠषिकेश कृष्णाजी पाटील, कपिल सावंत, ओंकार प्रमोद पाटील, आद्गील नंदुबिल, तोहील बिडीकर, शुभम मनोहर पाटील, सय्यद रमजान बागवान (सर्व राहणार खानापूर व बेळगाव) या संशयीतांचा समावेश आहे.
संशयीतांनी वासवाडो वाडी- बाणावली येथील जॅक कॉर्नरनजीक एक बंगला भाडेतत्वावर घेऊन बेटींग लावीत होते. याची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार अचानक छापा मारून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाईल, बेटींग साहित्य व वाहने असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारच्या रॉयल चॅलेंजर्स विरूध्द गुजरात टायटन्स या सामान्यावर बेटिंग केली जात होती.
खानापूर आणि बेळगावचे तरूण मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यात गुंतले आहेत. यापूर्वी ४ कोटींच्या सोने चोरी प्रकरणी खानापुरातील एका तरूण मडगाव पोलिसांनी अटक केली होती. ते प्रकरण ताजे असतांनाच पुन्हा आयपीएल बेटींग प्रकरण उघडकीस आले आहे. कोलवा पोलिस निरीक्षक सुनील पडवळकर अधिक तपास करीत आहेत.
ग्राऊंड रिपोर्ट: कुणाला मिळणार संधी? डॉ. निंबाळकर की कागेरी?
गेल्या वेळी उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे जवळपास पाच लाख मतांनी विजयी झाले होते. आता निवडणुकीच्या रिंगणात अनंतकुमार हेगडे नाहीत आणि भाजपची मोदी लाटही नाही. मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणताही जनाधार नसलेल्या निधर्मी जनता दलाला हा मतदारसंघ सोडला होता आणि अनंतकुमार हेगड यांना विजय मिळवून दिला होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली […]