समांतर क्रांती /खानापूर
वर्षभरापासून बेरोजगार असलेल्या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील तिओली येथे आज बुधवारी (ता.11) उघडकीस आली. प्रकाश कारू मिनोज (वय 32) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रकाश हा गेल्या वर्षभरापासून बेरोजगार होता. नोकरी मिळत नसल्याने तो हताश झाला होता. त्याचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे शिवारात कामाला गेले असता, एकटाच घरी असलेल्या प्रकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीय सायंकाळी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी त्याच्या आईने हंबरडा फोडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे.
Human-animal conflict: हा संघर्ष संपणार तरी कधी?
समांतर क्रांती / विशेष खानापूर तालुक्यावर निसर्गाने ओंजळ भरून अविष्कार केला आहे. भीमगड अभयारण्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पण, हा निसर्गच जनसामान्यांच्या जिवीतास धोका निर्माण करीत असल्याने तालुकावासीय हवालदिल झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील वन्यप्राणी- मुणष्य संघर्ष जटील बनत चालला आहे. लोकप्रतिनिधी आणि वनखाते तालुकावासीयांना संरक्षण आणि गजण्याची खात्री देण्यात कुचकामी […]