दिल्ली: प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे निधन झाले. तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
पंजाब घराण्याचे प्रसिध्द तबला वादक उस्ताद अल्लारखाँ यांचे जेष्ठ सुपूत्र असलेले झाकीर हुसैन यांची आज रविवारी (ता.१५) संध्याकाळी अचानक तब्बेत बिघडली. त्यांना तात्काळ अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारांचा उपयोग न झाल्याने त्यांचे निधन झाले.
त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले होते.
भीमगड अभयारण्यात वृक्षतोड, ‘बांधावरच्या शेतकऱ्यां’ची चलती
समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्य आणि सुमारे दहा कि.मी. परिघात वृक्षतोडीवर निर्बंध आहे. तरीही वनखात्याच्या आशिर्वादाने राजरोसपणे जंगलतोडीचे सत्र सुरूच आहे. ‘बांधावरच्या शेतकऱ्यां’नी मालकी जमिनीत शेतीसाठी वृक्षतोड चालविली आहे. गेल्या कांही वर्षात या परिसरात परप्रांतीय धनदांडग्यांचा वावर वाढला आहे. वनखाते भूमीपुत्रांना प्रत्येक बाबतीत कायद्याची फूटपट्टी लावते. पण, या धनदांडग्यांसाठी कायद्याचे उल्लंघन चालले असल्याचे दिसते. […]