कारवार: मतदानाला कांही तास शिल्लक असतांनाच भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा पडद्यामागील चेहरा उघडा पडला आहे. स्वत:स कट्टर हिंदुत्ववादी समजणारे कागेरी यांचे सी.ए.खलील याच्याशी संबंध असल्याचे फोटो समोर आले असून उत्तर कन्नडसह खानापूर आणि कित्तूरमध्ये खळबळ माजली आहे. कागेरी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी डॉ. बी.आर.आंबेडकर सेवा समितीचे हरिष बाबू एम यांनी केली आहे.
प्रक्षोभक भाषणे करून तरूणांना दहशतवादी कारवाई करण्यास भाग पाडणारा पीस टी.व्ही.चॅनेलचा मालक झाकीर नाई याचा अत्यंत निकटवर्तीय त्याच चॅनेलचा व्यवस्थापक अखिल उल रेहमान उर्फ सीए खलील याच्याशी कागेरी यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डॉ. बी.आर.आंबेडकर सेवा समितीचे अध्यक्ष हरिष बाबू यांनी कागेरी यांचे सीए खलील सोबतचे फोटो प्रसार माध्यमांसमोर प्रस्तूत केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, ०२ ऑक्टोबर २००८ रोजी कागेरी हे दुबई येथील इद मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी खलील याच्यासमवेत हस्तांदोलन करीत फोटो काढून घेतले तसेच हम सब भाई-भाई अशी घोषणाही दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांत हात असल्याच्या संशयावरून झाकीर नाईक व खलील यांच्यावर एनआयएची करडी नजर आहे. अशातच कागेरी हे थेट खलील याची गळाभेट घेतात, म्हणजे नक्कीच कांही तरी काळेबरे आहे, असा संशय हरिष बाबू यांनी व्यक्त केला आहे. मतदार संघात स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घ्यायचे आणि दुबईत जाऊन दहशतवादी कारवायांत सहभाग असणाऱ्यांसोबत मौजमजा करायची हीच भाजपचे कागेरी यांची नीतीमत्ता आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांना तात्काळ अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
… मग खानापूर-रामनगर महामार्ग का रखडला?
संवाद / चेतन लक्केबैलकर प्रचार म्हटलं की होणारच. पण, भाजपचे नेते ज्या पध्दतीने पातळी सोडून टीका करतात, आरोप करतात. माझ्या मतदार संघात भाजपचा उमेदवार पराभूत होणार हे कळून चुकल्यामुळे भाजपचे नेते बिथरले. त्यमुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते कांहीही बरळत होते. शेवटी भाजपची हीच संस्कृती आहे. गेल्या दहा वर्षात त्यांना लोकोपयोगी असे कांहीच करता आले नसल्याने […]