बेळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात दोन नराधमांनी एकाचा खून केला. नंतर नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. क्षुल्लक कारणावरून बारमध्ये एका व्यक्तीची हत्या झाली. बेळगावच्या मुडलगी येथील बारमध्ये ही घटना घडली आहे.
लक्ष्मण मारनूर नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला असून रंगप्पा पाटील व इराप्पा तुंगळ यांनी लक्ष्मणसोबत भांडण केले. त्यांनी हल्ला करून त्याचा खून केला.लक्ष्मण यांच्यावर हल्ला होत असल्याचा व्हिडिओही मोबाईलमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ एका स्थानिकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.
खुनाचे संशयित आरोपी रंगप्पा पाटील आणि इराप्पा तुंगल यांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासाविण्याचा प्रयत्न केला. मात्र लगेचच पोलिसांनी आरोपींना शोधून अटक केली आहे.